Homeचंद्रपूरचेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता पुष्पा राऊत यांची सरपंचदी अविरोध निवड

चेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता पुष्पा राऊत यांची सरपंचदी अविरोध निवड

गोंडपिपरी:- तालुक्यातील चेकलिखितवाडा येथे सुरवातीचे अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली.येथिल सरपंचानी राजीनामा दिला.यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सरपंच पदासाठी गुरुवारी(दि.५) निवडणूक पार पडली.यावेळी भाजपने बहूमताचे सदस्य आपल्याकडे ठेवल्याने विरोधकांनी सरपंचपदाच्या निवडणूकीत भाग घेतलाच नाही.यामूळे भाजपच्या सरपंचपदाच्या निवडीत पुष्पा राऊत यांची अविरोध निवड झाली.आणि चेकलिखितवाडा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.भाजपा नेते,माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांचे कुशल मार्गदर्शन आणि नेतृत्वात भाजपने चेकलिखितवाडा गावात सरपंचपद मिळविले. भाजप जिल्हा सहसंयोजिका कोमल फरकाडे यांचा मोलाचा वाटा निवडीदरम्यान कोमल फरकडे,प्रभाकर कोहपरे,प्रतिमा चंद्रगिरीवार हे ग्रा.पं.सदस्य सरपंच पदाच्या बाजूने राहिले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे,उपसभापती स्वप्निल अनमुलवार,संचालक सुहास माडूरवार,भाजपचे गोंडपिपरी शहरध्यक्ष तथा नगरसेवक चेतनसिंह गौर,संदिप पौरकार आदिसह वामण गेडाम,सुनिल फरकडे,रत्नाकर गेडाम,प्रकाश गावडे,निलकंठ राऊत,दिपक नेवारे,रविंद्र नेवारे,बंडू चंदनगिरीवार,रुपेश राऊत,सुरेश अंबाडरे,राहूल सरवर,मोहण ढूमणे,लक्ष्मण मडपल्लीवार यांची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!