ठमके मास्तर ठरले माणुसकीचे दुत….विद्यार्थ्याच्या आईसाठी दिली आर्थिक मदत

2290

चंद्रपूर: खरंतर शिल क्षमा आणि करुणा याचा तिहेरी संगम म्हणजे शिक्षक. पण सध्या घडीला किती शिक्षक असे आहेत की, जे या संकल्पनेला खरे उतरतात ? पण हीच प्रतिमा जपली आहे ती चंद्रपुरातील “ठमके मास्टर फिजिक्स” या नावांनी प्रसिध्द असलेले श्री. सचिन ठमके सर यांनी.

कु. श्रीकांत विजय माने, जिल्हा बीड हा ठमके सरांचा माजी विद्यार्थी. वेल्डिंगच्या कामाच्या शोधात वडील विजय माने हे आपल्या पूर्ण कुटुंबासहित बीड वरून 2 वर्षा आधी चंद्रपूरला आले. परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे अतिशय माफक फीसमध्ये ठमके मास्तरांनी त्याच्या मुलाला म्हणजे श्रीकांतला आपल्या अकॅडमीमधे एडमिशन दिले. आता दोन वर्षानंतर काल अचानक श्रीकांतचा ठमके सर यांना फोन आला आणि श्रीकांत नुसता रडत होता. कारण 10 दिवसाआधीच नियतीने त्याच्या वडिलांना त्याच्या पासून हिरावले होते. हृदय विकाराने त्याचे वडील मरण पावले होते.

वडिलांचे नुकतेच निधन आणि त्यातच श्रीकांतच्या आईची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. घरात अठरा विश्व दारिद्र्य नुकताच वडिलांचं हरवलेलं छत आणि आईची बिघडलेली प्रकृती करावं काय आईसाठी पैसे आणावे कुठून या विवंचेने मध्ये पुरता अडकेला श्रीकांत. “नियतीच्या या दारी न्याय कुणा मागू जिथे नशिबानेच पाठ फिरवली तिथे आधार कुणा मागू” अशी केविलवाणी अवस्था श्रीकांतची झाली होती. त्याने आईच्या प्रकृतीसाठी मदतीची याचना केली पण मदत होत नव्हती.शेवटी त्याला 2 वर्षा आधी ज्यांच्याकडे आपण शिकलो त्या ठमके सरांची आठवण आली आणि फोन वर भरल्या डोळ्यांनी त्यांनी पूर्ण करून कहाणी सांगितली.

तेव्हा क्षणाचा ही विलंब न करता आधी आईची ट्रीटमेंट सुरू कर पैसे मी पाठवेल म्हणत त्याला धीर दिला आणि त्याला गुगल पे च्या माध्यमातून तत्काळ आर्थिक मदत पाठवली. खरोखरच ठमके सर सारखी माणसे म्हणजे समाजात अजून सुध्दा माणुसकी जिवंत आहे याचे ज्वलंत उदाहरण आहेत. त्यांच्या या कार्याला इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचा मानाचा सलाम…