Homeचंद्रपूरराजुरास्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलचे खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड...

स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलचे खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड…

राजुरा: जिल्हा स्तरीय शालेय कॅरम व थ्रोबाॅल क्रीडा स्पर्धेत बामणवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस काॅन्वेंट स्कूलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरिता निवड.
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने, जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेत 14 वर्षा आतील वयोगटात मुलांमध्ये गौरव देवाळकर, कु. मौली बांगलादेश तर 17 वर्षा आतील वयोगटात कु. चारू कुलमेथे या खेळाडूंची गोंदिया येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली.
तसेच जिल्हा स्तरीय शालेय थ्रोबाॅल स्पर्धेत जिल्ह्यातील 27 संघानी भाग घेतला यात शाळेच्या 14 वर्षा आतील वयोगटात मुलींच्या गटात 5 संघानी भाग घेतला यात शाळेच्या मुलींच्या संघानी 2-0 या फरकानी अंबुजा विद्यानिकेतन, उपरवाही यांना मात दिली व हा संघ भंडारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करेल यात कु. श्रिया चौधरी, मानसी वांढरे, अनुष्का फरकाडे, खुशी रामटेके, आशा सिंह, अक्सा अजानी,निहारिका सातपुते, राजूरकर, सायली सिंदे, प्रतिक्षा वडस्कर, वैष्णवी वडस्कर व माही दुरुगकर या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. 14 व 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले तर 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय स्थान पटकावले कु. स्टेला पीटर, सिद्धी वाचामी या खेळाडूंची विभागीय ट्रायल करिता निवड झाली.
या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री भास्कर फरकाडे, प्रज्ञा मॅडम, अश्वती मॅडम, निलम मॅडम, भार्गवी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर आल्फी, सिस्टर प्रभा, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड,थ्रोबाॅल संघटने सचिव डॉ. राकेश तिवारी, क्रीडा अधिकारी श्री विजय ढोबाळे, शाळेचे सर्व शिक्षक वृंध व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!