Homeचंद्रपूरआम आदमी पार्टी महिला जिल्हाध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश विजय वड्डेटीवारांनी...

आम आदमी पार्टी महिला जिल्हाध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश विजय वड्डेटीवारांनी दुप्पटे टाकत स्वागत केले.

चंद्रपूर : जिल्ह्यातील जनतेच्या उमेदीवर काँग्रेस पक्ष हा खरा व विश्वसनीय ठरत असल्याने काँग्रेस पक्षाकडे अन्य पक्षातील नेते ही मोठ्या संख्येने आकर्षित होऊन प्रवेश घेत आहे.

17 सप्टेंबर 2023 रोजी विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुग्घूस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या माध्यमातून चंद्रपूर आम आंदमी पार्टी महिला जिल्हाध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्या सह शासकीय विश्रामगृहात विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार तसेच आमदार अभिषेक वंजारी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला प्रवेश घेणारे महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख,जिल्हा उपाध्यक्ष रूपा काटकर, जिल्हा उपाध्यक्ष मिना पोटफाडे,जिल्हा सचिव वंदना कुंदावार,सहसचिव सुभद्रा मून,सहसचिव शबनम शेख, झोन क्रं 01 अध्यक्ष स्नेहा महाकश्यप,झोन क्रं 02 अध्यक्ष स्वाती डोंगरे,उपाध्यक्ष पुष्पा बुधवारे,उपाध्यक्ष संतोषी यादव,झोन क्रं 03 महिला अध्यक्ष सुहास रामटेके,शहर उपाध्यक्ष भिमराव मेंढे, वाहतूक अध्यक्ष अभिजित संगेवार,मीडिया प्रभारी सुशील वाहूले,लक्ष्मण पाटील,मुकेश पांडे,शहर सहसचिव रज्जू भैय्या,झोन क्रं 03 अध्यक्ष अकीब शेख,अमजद खान व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर, रोशन दंतलवार,विशाल मादर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आप पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशा करिता काँग्रेस नेते अभिषेक सपडी यांनी अथक परिश्रम घेतले.
विरोधीपक्ष नेते वड्डेटीवार यांनी आप पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे दुप्पटे टाकत सर्वांचे पक्षात स्वागत केले
आपण काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने राहुल गांधी यांचे हात बळकट झाल्याने सर्वांचे आभार ही व्यक्त केले

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!