Homeदेश/विदेशमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट.... अंधश्रध्दा, आरोग्य जनजागृती याबद्दल मांडली...

मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट…. अंधश्रध्दा, आरोग्य जनजागृती याबद्दल मांडली संकल्पना…

मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवमानवी कौशल्य आणि विकास बहुउद्देशीय संस्था,चंद्रपूर यांच्या शिष्ट मंडळासह मुंबई येथील निवासस्थानी मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची अंधश्रद्धा जनजागृती तसेच आरोग्य मित्र हेल्थ कार्ड याविषयी संकल्पना मांडली असता सदर विषयाची मंत्री महोदयांनी विस्तृतपणे स्तुती केली आणि सदर विषयाची महत्वाची बाब समजावून सांगितली. असे म्हटले की,आजच्या युगात प्रत्येक क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणात प्रगती करताना दिसते आहे परंतु तेवढ्याच प्रमाणात आपण समाजातील अंधश्रद्धा व अवतीभवती चे आरोग्य या संदर्भात लक्ष देणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. प्रत्येकानी वैचारिक सूविचार समाजाला द्यावा.सदर संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा जनजागृती विषयक तसेच आरोग्य मित्र या हेल्थ कार्ड विषयी भेट घेतली असता भाऊंनी सदर विषयाचा व त्यांच्या अनुभवाचा आमच्या संस्थेस सविनय रित्या माहिती दिली.आज आरोग्याच्या सुविधा खाजगी स्तरावर घेतल्यास आरोग्य मित्र या कार्ड मुळे गरीब असो वा श्रीमंत जनतेला काही प्रमाणत सवलत मिळण्याचे ध्येय योजिले आसून भरपूर प्रमाणात जनता लाभ घेत आहे. याची इंचभुत माहिती मंत्री महोदय यांना दिली.

अंधश्रद्धा जनजागृती करणे ही समाजातील प्रत्येक घटकांची संघटित जबाबदारी आहे.आणि आपण आपल्या संस्थेचा माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक तळागाळापर्यंत जाऊन ही जनजागृती करण्याचा मानस व्यक्त करत आहात या कार्याकरिता माझे सहकार्य नेहमी राहील अशी भूमिका स्पष्ट केली. सदर उपक्रमाचे अंधश्रद्धा जनजागृती तसेच आरोग्य विषयक माहिती पुस्तिका मंत्री महोदयांना भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने  अशोक अंबागडे, सौरभ मादासवार, महेश भंडारे, सागर कातकर, किसन बोबडे, प्रशिल भेसेकर उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!