Homeचंद्रपूरकोरपनाजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे पालक मेळावा संपन्न

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे पालक मेळावा संपन्न

गडचांदुर: पंचायत समिती कोरपना अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव केंद्र सोनुर्ली या ठिकाणी दिनांक 9 सप्टेंबर 2023 ला गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी व केंद्रप्रमुख विलास देवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा संपन्न झाला या पालक मेळाव्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व निपुण भारत अभियान विद्या प्रवेश याबाबत पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली तसेच अध्ययन स्तर निश्चिती पायाभूत चाचणी आणि शाळेमध्ये सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सर्व पालकांना देण्यात आली त्यानंतर सर्व पालकांची मनोगते ऐकून घेण्यात आली व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा पालकांच्या समोर ठेवण्यात आला सदर पालक मेळाव्याला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम पाचभाई हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष वनिता ब्रह्मकिशोर पिंपळकर ग्रामपंचायत वडगाव चे उपसरपंच सुदर्शन डवरे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे गुरुजी तसेच पोलीस पाटील कुमारी कलावती मडावी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कैलास मेश्राम विठ्ठल मडावी ज्ञानेश्वर ढवळे श्रीकांत निखाडे संचिता मडावी श्यामकांत निखाडे सुरेंद्र निमकर प्रकाश शेडमाके ब्रह्मकिशोर पिंपळकर श्रीराम शेंडे नवनाथ राऊत विकास पिंगे अशोक टोंगे दिलीप टाले शंकर पिंगे संदीप लालसरे विनोद निंदेकर अतुल टोंगे मुकेश निमकर पुंडलिक उरकुडे दिगंबर उपासे गजानन भोंगळे प्रदीप अस्वले डोमाजी धोटे महेंद्र गोहोकार शशिकांत निखाडे तसेच महिला सदस्य देखील उपस्थित होत्या यावेळी उपस्थित पालकांमधून शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते श्री सुरेंद्र निमकर यांची निवड करण्यात आली तसेच शालेय पोषण आहार व दक्षता समितीची निवड देखील करण्यात आली यामध्ये देखील उपाध्यक्ष म्हणून ब्रह्मकिशोर पिंपळकर तर मुकेश निमकर सहसचिव यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सखाराम लालाजी परचाके विषय शिक्षक वसंत पांडुरंग गोरे शिवाजी किसन माने पुष्पा काकाजी इरपाते व सहाय्यक शिक्षक अनिल राठोड नितीन जुलमे व काकासाहेब नागरे यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन काकासाहेब नागरे यांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!