Homeचंद्रपूरपंतप्रधान मित्राच्या कंपनीकडून चंद्रपुरातील कामगारांची पिळवणूक बळजबरीने स्वेच्छा निवृत्ती तसेच कामाचे...

पंतप्रधान मित्राच्या कंपनीकडून चंद्रपुरातील कामगारांची पिळवणूक बळजबरीने स्वेच्छा निवृत्ती तसेच कामाचे दिवस कमी केल्याने कामगारांमध्ये नाराजी

उपरवाही ( चंद्रपूर ) येथील अदानी उद्योग समूहाच्या अंबुजा सिमेंट कंपनीकडून स्थानिक कामगारांची पिळवणूक सुरू आहे. विजयक्रांती कामगार संघटनेची अध्यक्ष या नात्याने या सर्व कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या.

बाहेरचे लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्याने ते स्थानिकांना डावलून कामासाठी गुजरात तसेच इतर राज्यातून कामगार आणून स्थानिकांच्या हक्काच्या नोकऱ्या बळकावत आहे. स्थानिकांनी या उद्योगासाठी आपल्या जमिनी दिल्या. त्यावेळी त्यांना नोकऱ्या देण्याचे कंपनीने जाहीर केले होते. मात्र आता स्थायी कामगारांना बळजबरीने स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. अस्थायी कामगारांना महिन्याला केवळ १० ते १५ दिवस काम देऊन पिळवणूक करण्यात येत आहे. हा अन्याय आज सहन केला तर भावी पिढ्यांसाठी तो धोकादायक ठरू शकतो. हळूहळू सर्वच स्थानिक कामगारांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येत लढा उभारावा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले.

यावेळी सरपंच गिताताई सिडाम, अंबुजा सिमेंटच्या विजयक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील ढवस, दशरथ राऊत, बबन आत्राम, पोलिस पाटील रघु मडावी यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!