बेंबाळ : प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत असून परिसरातील आठ गावातील जनतेला शुद्ध पाण्यासाठीभटकंती करण्याची वेळ आली आहे.
बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजने मध्ये गोवर्धन, नांदगाव,घोसरी बेंबळ नवेगाव भु. बाबराळा,कोरंबी,चेक दुगाडा, या गावाचा समावेश आहे, एन पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी पिण्याची नामुष्की जनतेवर ओढवली आहे. त्यामुळे परिसरात साथीच्या आजारात वाढ झाली आहे, या पाणीपुरवठा योजनेमध्ये कंत्राटदाराचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे, प्रशासनाने याची दखल घेऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा यासाठी मूल,पोंभुर्णा, तालुक्यातील सर्व सरपंचांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन वरील गंभीर पाणी समस्या निकाली काढावी, अन्यथा नागरिकांना महिलांना रस्त्यावर उतरून पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागणार, संबंधित पाणी प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू करावा अशी आठही गावातील जनतेची मागणी आहे.