Homeचंद्रपूरपारडी येथे 6 ते 9 तारखेपर्यंत वारकरी करणार पायदळ प्रवास....

पारडी येथे 6 ते 9 तारखेपर्यंत वारकरी करणार पायदळ प्रवास….

चंद्रपूर: विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट पारडी येथे 6 तारखेपासुन तर 9 तारखेपर्यंत तब्बल 115 किलोमीटरचा  पायदळ प्रवास वारकरी करणार आहे.

श्रीकृष्ण जन्म अष्टमी असल्यामुळे नगाजी महाराजाचे प्रचार, प्रसारक नरेश मांडवकर,शंकररावजी नक्षीने, महादेवराव वनकर, नगाजी दरवरकर, ज्योतीताई लांडगे  यांनी  बुधवार पासून ते शनिवार पर्यंत चंद्रपूर ते पारडी असा पायदळ करणार आहे. काही लोकांना अजूनही माहिती नाही की, नगाजी महाराज्यांचे देवस्थान कुठे आहे….? पारडी येथे महाराजाचे प्राचीन मंदिर आहे. अजूनही तीथे दर्शन घेण्याकरिता भक्तगण दूरवरुन येत असतात.  नगाजी महाराज यांचे मंदिर पारडी, हिंगणघाट येथे आहे.प्रत्येक हा व्यक्ती कुठल्या ना कुठल्या धार्मिक क्षेत्रात जुडून असतो. कोणी शिर्डीला जातो, कोणी शेगावला जातो, कोणी पंढरपूरला जातो, कोणी बालाजीच्या दर्शनाला जातो. अशाच प्रकारे  प्रत्येक बांधवांनी पारडी येथे जाऊन नगाजी महाराजाचे दर्शन घ्यावे. प्रत्येकाला नगाजी महाराजाचे मंदिर कुठे आहे हे कळेल. नगा जी महाराज हे मंदिर वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट नांदगाव चौरस्ता वरून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. येथे वारकरी पायदळ प्रवास करणार आहे . याबद्दल कृष्णाजी चौधरी, निलेश अतकरे, संदीप नक्षीने, सचिनभाऊ विचरणकर, गणेशभाऊ वनकर,सुधाकरजी बोरकर,श्रीहरी गौरकर,सतीशजी इंगडे, सतीशजी नारायणदास, गणेशजी सैदाणे, श्रीकांतजी चौधरी, राजेश्वर सुंदरगिरी, देविदासजी चौधरी, सतीशजी कंदिवार, पंकज श्रीवास, यश श्रीवास, गजानन चांदेकर, अमोल राजूरकर, बादल लांडगे, अतुल चणेकर व  अखंड नाभिक बहुउदशीय संस्थाचे सदस्यगण यांनी  पायदळ प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!