राजुरा: तालुक्यातील नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल वरुर रोड येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या वेशभूषा करून मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा केला…यावेळी नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि तक्षशिला बहुउद्देशीय अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थाचे अध्यक्ष प्रा. उत्कर्ष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला शिक्षिका अश्विनी तेलंग, श्रद्धा गेडाम, कोमल वानखेडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.