औद्योगिक कंपन्यातील राख वाहून नेणाऱ्या हायवा ट्रकच्या अपघातात पती पत्नी ठार.. वरोरा तालुक्यातील घटना…

728

वरोरा: तालुक्यातील रामपूर जवळ एका हायवा ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात पती पत्नी जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी (ता.३०) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

वरोरा तालुक्यातील मोहबाळा औद्योगिक वसाहतीतील जिएमआर कंपनीतील राख घेऊन हास्ट्रक कंपनीचा हायवा ट्रक क्र. सी जी १२ बी डी ०१०३ हा वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथील खदानीकडे भरधाव वेगाने जात होता. चंद्रपुर-नागपुर महामार्गावरील रामपूर गावाजवळ दुचाकी क्र. एम एच ३३ डी ३२६४ ला जबर धडक दिली. या अपघातात पती पत्नीचा दुदैवी मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की , दुचाकीस्वार हायवा ट्रकच्या चाका खाली दबून राहिला. सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीस्वाराला बाहेर काढले. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.