राष्ट्रध्वज उतरविण्याचा नागरिकांना पडला विसर… गडचांदुर येथील प्रकार…

865

गडचांदुर: हर घर तिरंगा अंतर्गत गडचांदुर येथील शेकडो नागरिकांना नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रध्वज देण्यात आले होते. पण आज १५ दिवसाचा काळ लोटला तरी अनेकांच्या घरावर अजुनही राष्ट्रध्वज फडकत आहे. या प्रकाराकडे नगर परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

हर घर तिरंगा अभियान 2023 अंतर्गत, शासनाने नागरिकांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या खाजगी घरावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावण्यास सांगण्यात आले होते. प्रत्येक नागरिकाने आपापल्या निवासस्थानी तिरंगा फडकवला आणि स्वातंत्र्य दिवसानिमित्य “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी केले. परंतु अजूनही नागरिकांनी घराच्या छतावरून राष्ट्रध्वज काढला नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान होत असतानाही नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तात्काळ सदर प्रकाराकडे नगर परिषदेने लक्ष द्यावे.