तळोधी मोकासा बस स्थानकावर मुत्रिघर सुविधा उपलब्ध करा…. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळोधी मोकासा कडून सरपंच व गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी….

645

तलोधी(मो) – गाव हे राज्य मार्गावर असून या ठिकाणांहून अनेक ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व खाजगी बसेस ये-जा करतात. त्यामुळे येथे प्रवाशाची मोठी वर्दळ असते. मात्र या ठिकाणी मुत्रिघराची अद्याप सुविधा उपलब्ध केली गेली नसल्याने नागरिकांना व प्रवाशांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत येथिल ग्राम पंचायत प्र.सरपंच श्री. मनोहर बोदलवार व गट विकास अधिकारी चामोर्शी यांची भेट घेत निवेदन दिले व बस स्टँड तळोधी(मो) येथे मुत्रीघराची लवकरात लवकर सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार्मोशी तालुकाध्यक्ष चंद्रकांत पिपरे ,तालुका उपाध्यक्ष अंकुशभाऊ संतोषवार, सुधीर भांडेकर, शहराध्यक्ष शुभंम भांडेकर, शहरउपाध्याक्ष आकाश नेवारे, तालुका सचिव सौरभ मुनघाटे, मनविसे अध्यक्ष सांरग भांडेकर, तालुका संघटक अभिषेक कोत्तावार, मनसे सैनिक संतोष राजकोंडावर, प्रितेश गांगरेद्दीवार, मनशू सातपुते, आशिष भांडेकर,योगराज गेडाम,मिहिर पुष्टेवार, शंकर पुद्देवार,कुणाल उंदिरवाडे ई उपस्थित होते.