जिल्हा उपाध्यक्ष  मोहन चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अल्प आहाराचे वितरण…

313

चंद्रपूर:  मोहन भैय्या चौधरी यांचा वाढदिवस देवाडा येथील डेबू सावली वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. देवाडा येथील वृद्धाश्रमात तेथील आश्रयित आजी आजोबांना अल्प आहारचे वितरण करून त्यांच्या सोबत वेळ वाया घालवून व व इतर चर्चा करून वाढदिवस साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणे श्री. मोहन भैय्या चौधरी आपला वाढदिवस यार वृद्धाश्रमात मोठ्या उत्सुकतेने साजरा करतात. परंतु या वेळी काही कारणत्सव श्री. मोहन भैय्या चौधरी वाढदिवस साजरा करताना हजर नव्हते परंतु मोहन भैय्या चौधरी यांच्या निर्देशनात मित्र परिवार तर्फे ह्या उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. डेबू सावली वृद्धाश्रम देवाडा ह्या आश्रमाची ओळख चंद्रपूर जिल्ह्यात वेगळ्या प्रकारे एक छाप सोडली आहे खर तर इथलं नैसर्गिक वातावरण इथली स्वच्छता आणि आश्रयित आजी आजोबांचा स्वभाव च इतर लोकांना मोहक करायला पुरेसा आहे. अश्यातच आज दि.३० ऑगस्ट ला श्री. मोहन भैय्या चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डेबू सावली वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास अंकित जोगी, जितेश सोनटक्के, अक्षय दांडेकर, उमेश वाकडे, गौरव बारापात्रे,सुमित कांबळे, टेकचंद बरडे, शिव वराटे इत्यादी उपस्थित होते.