चंद्रपूर: स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनानिमित्त रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला अनेक पोलिसांनी हजेरी लावत शहरातील भगिनींच्या रक्षणाचे वचन दिले.
रक्षाबंधन असो, वा अन्य कोणताही सण, पोलिसांना शहरातील शांतता, कायदा सुव्यस्था सांभाळण्यासाठी कामावर हजर राहावे लागते. त्यामुळे अनेकदा आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधनासारखा सण साजरा करता येत नाही. त्यामुळे चंद्रपूर येथील स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर ने यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत साजरे करण्याचे ठरवले. चंद्रपूर येथील रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरे केले. आम्हाला अनेकदा कामामुळे आमच्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा करता येत नाही, आज शहरातील या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे केल्याने, आम्हालाही अत्यंत आनंद झाल्याची भावना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रामुख्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत आष्टनकर, चंद्रपूर शहर प्रमुख करीना बोपचे, युवती प्रमुख सानिका अलगुणवार, कोषप्रमुख अपेक्षा भालेराव, संपर्क प्रमुख अंकित पांडे, अभिषेक गुज्जनवार, रोशन आस्टुनकर, वैष्णवी मत्ते, दिप्ती खोब्रागडे, प्रगती मार्कंडावार, मंजुषा वैद्य, कामाक्षी झोडे, खुशी बिसेन, नुरी शेख, कल्पना गोखरे व अन्य सदस्य यांची उपस्थित होती.