नेहरू युवा केंद्र तर्फे राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा..

570

चंद्रपूर: नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार तर्फे राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष निशिकांत आष्टनकर यांनी उपस्थित खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तालुका प्रतिनिधी प्रगती मार्कंडवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी अनिप नागापुरे, अमोल गराडकर, आदित्य नागापुरे, आयुष मस्मारे, सुनील भांडेकर, प्रशांत कुकुडकर, प्रज्वल रामटेके, उमेश वांढरे व विद्यार्थी उपस्थित होते.