Homeगोंडपीपरीगोंडपीपरी येथे जनसंवाद पदयात्रा नियोजनार्थ कार्यकर्ता बैठक संपन्न.

गोंडपीपरी येथे जनसंवाद पदयात्रा नियोजनार्थ कार्यकर्ता बैठक संपन्न.

गोंडपीपरी :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गोंडपीपरी येथे दि. ३ ते १२ सप्टेंबर २०२३ या दरम्यान अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर होणाऱ्या ऐतिहासिक जनसंवाद पदयात्रेच्या नियोजनार्थ आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जनसंवाद पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी उपस्थित सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुकाध्यक्षा सोनू दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, अशोक रेचनकार, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, नगरसेविका वनिता वाघाडे, वनिता देवगडे, रामगीरकर मॅडम, शंभुजी येलेकर, देविदास सातपुते, विपीन पेद्दुलवार, यु. काँ. अध्यक्ष संतोष बंडावार, साईनाथ कोडापे, राजू झाडे, नरेंद्र वाघाडे, धिरेंद्र नागापुरे, गौतम झाडे, जितेंद्र गोहणे, रमेश हुलके, मनोज नागापुरे, बालाजी चनकापुरे, सारनाथ बक्षी, काशिनाथ पोटे, सोनू कोवे, नामदेव सांगडे, आनंदराव कोडापे, शालीक झाडे, रामदास ठाकरे, शांताराम वेलादी, कवडू खरबनकर, पुंडलिक चौधरी, हरीचंद्र मडावी, शीतल वाढई, सरिता पेटकर, जानवी तेलकापल्लीवर, आशिष निमगडे, राजू राऊत, मारोती भोयर, विलास चौधरी, अनिल फरकडे, मारोती भोयर, शुभम पिंपळकर, नितेश मेश्राम, निकेश निखाडे यासह तालुका काँग्रेसच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कृ. उ. बा. समितीचे संचालक, माजी जि. प सदस्य, माजी प. स. सदस्य, सेवा सहकारी संस्थांचे संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यासह शेकडोंच्या संख्येने गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!