Homeगोंडपीपरीप्रवीण घ्यार बिनविरोध अध्यक्षपदी... पोडसा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी...

प्रवीण घ्यार बिनविरोध अध्यक्षपदी… पोडसा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड…

गोंडपिपरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तेलंगाना सीमेजवळील पोडसा ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच देविदास सातपुते यांचे अध्यक्षतेखाली विविध विषयावर पार पडली.

दरवर्षी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या म. गां. तंटामुक्त समितीवर एक तृतीयांश कमिटी नव्याने निवडली जाते. दरम्यान आज झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीवर मागील वर्षी निस्पक्षपातीपणे तंटामुक्त समितीवर उत्तम सेवा दिलेले व गावातील तंटे गावातच मिटवत विविध भांडणे हाताळून गाव तंटामुक्तीच्या मार्गावर लावण्यासाठी सतत प्रयत्न केलेले. श्री.प्रवीनजी घ्यार यांची पुन्हा एकदा ग्रामसभेला उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सर्वानुमते बिनविरोध निवड केली.

प्रवीण घ्यार हे क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे कट्टर समर्थक असून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. दरम्यान त्यांच्या बिनविरोध तंटामुक्त अध्यक्षपदी निवडीने गावातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले..

प्रसंगी सरपंच देविदास सातपुते,उपसरपंच गुरुदास उराडे, सदस्या माधुरी देविदास सातपुते, सदस्या योगिता विनायक येलमुले,सदस्या नीलिमा पुरुषोत्तम येलमुले, सदस्य भारत घ्यार, सदस्या सारिका गोहणे, ग्रामसेवक नारनवरे, पो.पा.निर्मला येलमुले,महेंद्र येलमुले, सुदर्शन गोधडी, रमेश गिनघरे, संतोष अलगमकार, यासह गावातील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!