चंद्रपूर : महाराष्ट्र होमगार्ड सैनिकांच्या 10 दिवसीय राज्यव्यापी आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाने निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर वरोरा भद्रावती मतदारसंघाचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी होमगार्ड सैनिकांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील यांनी दिलेल्या निवेदनात होमगार्ड सैनिकांच्या खालील मागण्यांचा समावेश आहे:
केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेल्या दि. 17 जानेवारी 1984 चा आदेश चे अमलबजावणी करून होमगार्डना 365 दिवस नियमित करण्यात यावे, बॉम्बे होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर 3 वर्षानी होणाऱ्या पुर्ननोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली अथवा पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, पोलीस विभाग प्रमाणेच राज्याचे दर आर्थिक वर्षी त्यांचा बजट सत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजट ची व्यवस्था निर्माण करावे तसेच प्रतिवर्ष महागाई दरानुसार होमगार्ड विभागाला महागाई भत्ता उपलब्ध करण्याचे विधान तयार करण्यात यावे, इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील 3 वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग किंवा इत्यादी शासकीय प्रशासकीय विभागात 5 टक्के आरक्षण सह भरती निवळ प्रक्रियेत वयात आणि उंचीत विशेष सवलत देवूनी सरळ भरती वा नेमणूक देण्यात यावी, बॉम्बे होमगार्ड अधिनियम 1947 कलम 9 नुसार होमगार्ड हा लोकसेवक समजण्यात येतो त्यानुसार होमगार्ड प्रशासकीय लोकसेवकांप्रमाणे सोयी सेवा सुविधा देण्यात यावे, होमगार्ड सैनिकांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा किमान 60 वर्षे पर्यंत करण्यात यावी, माननीय सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातवा वेतनुसार रु. 990 रुपये दर प्रमाणे मानधन वेतन मान वाढवून देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
या संदर्भात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले की, होमगार्ड सैनिकांना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. यावेळी होमगार्ड सैनिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य करून होमगार्ड सैनिकांना न्याय दिला पाहिजे, यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.







