राजुरा: तालुक्यातील गोवरी (चिंचोली) येथे विविध ठिकाणी गप्पी मासे सोड्यात आले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय,चिंचोली येथील विद्यार्थ्यांना हत्तिपाय व डासांमुळे होणारे आजार आणि गप्पी मासे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांच्या आदेशानूसार गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम सुरू आहे. यामुळे दिनांक २५ ऑगस्टला राजुरा तालुक्यात राष्ट्रीय हत्तिरोग नियंत्रण पथक विरूर गाडेगाव आंतर्गत सादर उपक्रम गौरी, चिंचोली येथे राबविण्यात आला. सादर उपक्रमाला आरोग्य कर्मचारी राहुल एस. धानोरकर, के. ए. विभुते, वी. एम मिलमिले, आर. एन. गोरे, एम. एम टोंगे उपस्थित होते.