कधी संपणार हा वनवास रे ??? लाठी विना लाठीत कसे चालावं??

651

लाठी हे गाव केवळ पंचक्रोशीतच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यात या गावाची विशेष ओळख आहे. आणि विविध क्षेत्रात चांगल्या पदावर गेलेली माणसं या गावाने घडवली आहेत… पण आज याच गावाची ओळख धड रस्ता नसलेला गाव अशी केली जात आहे.. याचं कारणही असंच आहे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याच्या नावावर या गावाच्या रस्त्याने डांबर किंवा सिमेंट कधी पाहलच नाही ,उलट सपाटीकरणाच्या नावावर इथे मुरूम भरला जातो.आणि पाऊस पडला की हाच मुरूम मग आपले रंग दाखवतो..रस्त्याची अवस्था इतक्या दुरावस्थेमध्ये बदलते की चालणारा कोण? कुठे? घसरून पडेल हे समजायला पर्याय नसतो.. म्हणून लाठीत चालताना लाठी घेऊन चालल्या शिवाय पर्याय नाही असे सुद्धा आता म्हटलं जातं, यामध्ये सर्वाधिक नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे कारण गणवेश खराब झाला तर शाळेमध्ये गुरुजी आणि घरी आई ओरडते पण गणवेश खराब न करता या रस्त्याने चालने म्हणजे सध्या तरी प्रचंड मोठ आव्हानच आहे,तेव्हा ग्रामपंचायत लाठी ने रस्त्याच्या पुढे स्वच्छ पाण्याने भरलेली एक बादली एक निरमा पुडा आणि एक साबण तरी ठेवावी अशी सुद्धा गमतीशीर मागणी केली जात आहे..अगदी बसस्थानकाला लागून गावामध्ये येण्याचा हा प्रमुख रस्ता असल्याने दुसरा कुठला पर्याय पण नाही आहे ,म्हणून गावाबाहेरील शेतशिवाराकडे जाणारे पांदन रस्ते तरी बरे पण हा रस्ता नको अशी संतप्त चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची मागणी करून सुद्धा अजूनही कुठल्याच लोकप्रतिनिधीच या रस्त्याकडे लक्ष जात नाही, ग्रामपंचायत लक्ष द्यायला तयार नाही,
तेंव्हा आता या रस्त्याची अवस्था पाहून आता इथे धानाची रोवणी करायची की काय? आणि त्यासाठी ग्रामपंचयतीत परवानगी देईल काय असाही प्रश्न इथल्या नागरिकांना पडत आहे…