Homeगडचिरोलीराहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती ; काँग्रेसमध्ये आनंदोत्सव

राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती ; काँग्रेसमध्ये आनंदोत्सव

गडचिरोली:: काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी शेतकऱी, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरीब जनेतपासून तर समाजातील इतर घटकाच्या समस्यांना घेऊन विशेषता अदानीच्या घोटाळ्याला घेऊन नेहमी आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबन्याकरिता गुजरात येथे भाजप सरकारच्या दबावाखाली मानहानीचे खोटे खटले चालवून भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही, मनमानी व सुडबुद्धीच्या राजकारणातून मा. राहुलजी यांना शिक्षा झाली होती. खोट्या तक्रारीच्या माध्यमातून भाजपाने हे षडयंत्र रचले होते. पण देशात अजून न्याय व्यवस्था आहे, या न्यायव्यवस्थेनेच भाजपा व मोदी सरकारचे मनसुबे उधळून लावले आहेत. मा. सुप्रीम कोर्टाने शिक्षेला दिलेली स्थगिती हा सत्याचा विजय असून राहुल गांधी यांना मिळालेल्या शिक्षेच्या स्थगितीबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉक्टर नामदेव किरसान, रोजगार सेल जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, सहकार सेल जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजवाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, ग्राहक सेल अध्यक्ष भारत यरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंतराव राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, दिलीप घोडाम, माजी नगरसेवक रमेश चौधरी, गुलाब मडावी, शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी मोरे, सह संपर्कप्रमुख विलास कोडापे, शहर उपाध्यक्ष राकेश रत्नावर, सुरेश भांडेकर, सुभाष धाईत, बंडोपंत चिटमलवार, भैय्याजी मुद्दमवार, धिवरु मेश्राम, फिरोज हुद्दा, प्रफुल आंबोरकर, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, जावेद खान, सदाशिव कोडापे, अविनाश श्रीरामवार, विवेक बारशिंगे सह मोठ्या संख्येने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!