Home चंद्रपूर ब्रम्हपुरी अंगणात असलेली दुचाकी चोरट्यांनी पळविली… ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक….

अंगणात असलेली दुचाकी चोरट्यांनी पळविली… ब्रम्हपुरी पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक….

472

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव येथील सुजित नंदनवार यांच्या घराच्या अंगणातून मोटार सायकल चोरीला गेली.ही घटना सोमवारी (ता.३१) रोजी घडली. मोटार सायकल कुठेच भेटली नाही. यामुळे सुजीतने ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीसांनी या घटनेची सखोल चौकशी केली. चौकशीअंती पोलीसांना दोन आरोपींना अटक केली. कुलदीपसिंग जर्नेलसिंग अंधरेल (वय २३),कुंदनसिंग जर्नेलसिंग अंधरेल (वय१९) असे आरोपीचे नावे आहेत.

सोमवारी सुजीतला घराच्या अंगाणात मोटार सायकल दिसली नाही. त्यामुळे गावात चौकशी सुरु केली. या चौकशीवरुन गावातील रविंद्र ठेंगरे आणि नरेंद्र वैद्य यांनी पगडी लावून असलेल्या दोन तरुणाला ब्रम्हपूरीच्या दिशेने डब्बलशीट बसून जाताना पाहिले. त्यानंतर स्वत: सुजीतने ब्रम्हपूरी येथे जाऊन मोटार साकलचा शोध घेतला. मात्र त्याला मोटार सायकल मिळाली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलीसांनी तपास करुण दोन आरोपींना अटक केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे करीत आहेत.

Don`t copy text!