Homeचंद्रपूरजिवतीअतिवृष्टीमुळे तालुक्यासह शेतकऱ्यांच्या शेतीला मालाला मोठा फटका शेतीकडे बघितले तिकडे गवत...

अतिवृष्टीमुळे तालुक्यासह शेतकऱ्यांच्या शेतीला मालाला मोठा फटका शेतीकडे बघितले तिकडे गवत भरगच्च वाढलेले दिसतेय बळीराम काळे, जिवती

जिवती: सतत होणाऱ्या मुसळधार अतीपावसाने तर, पट्टेधारक व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या शेती वाहून गेल्या,या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेत शिवारात पाणी साचून अनेकांच्या शेतीला नाल्याचे तर कुठे डबक्याचे स्वरूप निर्माण झाले आहे.

या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना शेतीत घटकाभर मशागत करण्यासाठी आवश्यक तशी पुरसद दिली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना मेहनत शेतीची कामे करण्यासाठी विलंभ झाला आहे.त्यासाठी त्यांच्या शेती बघितल्या म्हणजे तनमय, गवतमतय शेती झाल्या आहेत.तसेच मुसळधार पावसाने हजेरी कायम राखून ठेवली असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेतकरी पावसाने घरी असल्याने त्यांच्या शेतातील पिकासह शेतातील साहित्य व रासायनिक खतेसुद्धा वाहून गेली.त्यामुळे शेतकऱ्यांचे हिशोब पूर्ण बिघडून गेले आहे.
माणिकगड पहाडावरील खरीप हंगाम पूर्णतः कोलमडून पडल्याचे चित्र दिसत आहे.
येल्यापुर येथील शिवदास शिनगारे,हिर शाव पेंदोर,देवाला चव्हाण,बापुराव पेंडोर,राम चव्हाण,भिमु कुंमरे,अंबादास राठोड यांचे अतीपावसामुळे मोठे नुकसान झाले. लांबोरी,नारपठार , कमलापुर, शेळवाही (लां), गुडशेला , सेवादासनगर,हटकरगुडा, मांगगुडा,नौकेवाडा,महाराजगुडा,वंजारीगुडा,करणकोंडी,घारपाना,
मरकलमेटा, हिमायतनगर, माराई पाटण, टेकामंडवा, शेंणगाव,दंपुरमोहदा,झांजनेरी,भोलापठार,भारी,शेडवाही(भारी), बाबापूर यासह इतरही अनेक गावातील तसेच नदी,नाल्याच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पावसाने वाहून गेली आहे.तरी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे की,शेती नुसकानीची मौका चौकशी करून भरपाई मागणी आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!