बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : ग्रामपंचायत माराई पाटण येथे एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात गावातील डॉ.पुजा गायकवाड यांच्या हस्ते सुमारे 120 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात मुख्यतः सर्दी, खोकला, ताप, तसेच रक्तदाब (BP) यांसारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.उपस्थित
शिबिरात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आरोग्य तपासणीसह प्राथमिक उपचार, औषध वाटप व सल्ला देण्यात आला. ग्रामपंचायत डॉ. पुजा गायकवाड,अमृता देवगडे (ANM), सारिका भालेराव (ANM),रामेश्वर शेळके,परमेश्वर राठोड, आशा,चंदा कोटनाके,कोमल
गायकवाड,ग्राम.पंचायत माराईपाटण उपसरपंच विकास सोनकांबळे,सचिव विकास सुर्यवंशी,पोलीस पाटील राहुल सोनकांबळे,सामजिक कार्यकर्ते बळीराम काळे,प्रदीप काळे,बालाजी कांबळे,व्यंकटी कांबळे उमेद कॅडर Mcrp संगीता काळे,Bdsp अश्विनी काळे आणि गावातील सदस्य व स्थानिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले.