Homeचंद्रपूरमारेकऱ्यांचा नेम चुकला आणि पूर्वाशाचा जीव गेला.... राजुरात गोळीबार पोलिसांनी...

मारेकऱ्यांचा नेम चुकला आणि पूर्वाशाचा जीव गेला…. राजुरात गोळीबार पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात….

राजुरा :- येथे झालेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे (27)हीचा जागीच मृत्यू झाला.तर या गोळीबारात लल्ली शेरगील(20) जखमी आहे.

राजुरातील सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रविवारी 23 जुलै रात्री 8:30 वाजताच्या सुमारास भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने मारेकऱ्यांचा नेम चुकला व पूर्वशाच्या छातीला गोळी लागली. यात ती जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली असल्याने तो जखमी झाला. सदर घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा ह्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे त्यांचे काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्याबरोबर बाहेर गेले होते. पूर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना राजुरा पोलिसांनी अटक केली आहे. यात आरोपी लबज्योत सिंह दहेल व दुसरा आरोपी अल्पवयीन असून दोन्ही आरोपींवर भादंवी कलम 302, 307, 34 व अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे ह्यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी ह्यांचे नेतृत्वातील डीबी पथकाने केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!