Homeचंद्रपूरमहिलांवरील अत्याचार; माणुसकीला कलंकित करतो- इ झेड खोब्रागडे (माजी निवृत्त सनदी अधिकारी)

महिलांवरील अत्याचार; माणुसकीला कलंकित करतो- इ झेड खोब्रागडे (माजी निवृत्त सनदी अधिकारी)

मणिपूर मध्ये महिलांची विटंबना देशासाठी शर्मनाक घटना आहे. माणुसकीला कलंकित करणारी आहे. देशातील सर्व महिलांचा अपमान आहे. निषेधाचे शब्ध अपुरे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश यांनी मणिपूर च्या घटनेचा विडिओ पाहिला, खूप व्यथित झाले आणि सरकारला कठोर शब्दात कार्यवाहीचे निर्देश दिलेत.हेच काम कार्यापालिकेने संवेदनशील होऊन वेळीच करणे अपेक्षितच नाही तर ते संविधानिक कर्तव्य आहे. कार्यपालिकेतील सिविल सर्विस अपयशी ठरली आहे. मुख्यसचिव, डिजिपी दर्जाचे सनदी अधिकारी, IAS, IPS चे अधिकारी अपयशी का ठरतात? सत्ताधारी यांची गुलामी कशासाठी? घेतलेल्या संविधानाच्या शपथेशी प्रामाणिक का राहत नाही? आपला Inner Voice का ऐकत नाही? की मेला आवाज? हरपला स्वाभिमान? एवढा भीतरेपणा का? पाठीचा कणा ताठ का नाही? सनदी अधिकारी संविधान निष्ठ होतील तर, समस्या उदभवणार नाहीत , त्यावर मात होईल. अन्याय होणार नाही.
मणिपूर च नाही तर देशात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांना देशाची सिव्हिल सर्विस जबाबदार ठरत आहे कारण चुकीच्या नेत्यांचे चुकीचे निर्देशाचे पालन करतात आणि संविधान व कायदा बाजूला ठेवतात किंवा सत्ताधारांना खुश करण्यासाठी किंवा त्यांचे राजकीय सोयीसाठी, फायद्यासाठी कायदा वापरतात. त्यामुळे, लोकांनी सनदी अधिकारी यांना प्रश्न विचारले पाहिजे, अस्वस्थ केले पाहिजे, संविधानिक नितीकर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. सिविल सर्विस- सनदी अधिकारी हे संविधान व कायद्यानुसार ,संवेदनशीलतेने, प्रामाणिकपणे,निपक्षपणे व निर्भयतेने, बदली, प्रोमोशन पोस्टिंग ची चिंता न करता , वर्तन करू लागले तर सत्ताधारी चुकीचे व वाईट काम करवून घेऊ शकणार नाहीत. खूप गोष्टी कंट्रोल मध्ये येतील.
भारत 140 कोटींचा देश आहे, जवळपास 50% महिला आहेत. जात धर्म,लिंग प्रांत प्रदेश, भाषा, असा कोणताही भेद न करता, सर्वांनी अशा अमानवीय घटनांकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही मुकदर्शक होऊ शकत नाही .सनदी अधिकाऱ्यासोबतच, आपले निर्वाचन क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारून उत्तर मागितले पाहिजे कि महिलांवरील जघन्य अपराधाबाबत त्याचे काय मत आहे (मणिपूर व इतर ठिकाणचे) । सत्ताधाऱ्यांविरुद्ध लोकशाही मार्गाने जनमत तयार करण्याची गरज आहे. न्यायासाठी आवश्यक आहे. सत्ताधारी कोणीही असोत, कोणत्याही पक्षाचे असोत. लोक सार्वभौम आहेत, देशाचे संविधान सर्वोच आहे. देश आणि देशाची अखंडता मह्त्वाची आहे. लोकांचे मूलभूत अधिकार आणि सन्मानपूर्वक जगणे खूप महत्वाचे आहे. यासाठी बोलावे लागेल, आवाज करावा लागेल.
इस दौर सियासत का इतनासा फसाना है।
बस्ती भी जलानी है और मातम भी मनाना है।

इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन, नागपूर
दि 24 जुलै2023
M-9923756900.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!