Homeगोंडपीपरीव्यसनमुक्तीसाठी गणपती चौधरींचे कार्य प्रेरणादायी ; मागासवर्गिय आयोगाचे अध्यक्ष हंसराज...

व्यसनमुक्तीसाठी गणपती चौधरींचे कार्य प्रेरणादायी ; मागासवर्गिय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडून चौधरींचा सन्मान

गोंडपिपरी :-धावपड आणि धकाधकीच्या या दूनियेत वेळेला अधिक महत्त्व प्राप्त झाले.असे असतांना जीवन जगतांना आपणही समाजाचे देणे लागतो,या भावनेतून काम करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच.अश्यात आपले कामकाज सांभाळून सेवाभावी वृत्तीने सामाजिक कार्यात वेळ देणाऱ्याचे प्रमाण आता बोटावर मोजण्याईतपर उरले.अशाही विपरीत स्थितीत मात्र लोकांच्या हितासाठी पुढे येऊन जीवन मार्गक्रमण करतांना दारू व्यसनाने वाट चूकलेल्यांसाठी काम करणारी मंडळी दिसून येते.गणपती चौधरी(गुरुजी) त्यापैकीच एक.एका कार्यक्रमाचे निमित्त साधत हंसराज अहिर यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला.

गणपती चौधरी(गुरुजी) परम पुज्यनीय शेषराव महाराज शिरपूर(बुलढाणा) सलग्णित संघटनेच्या माध्यमातून २०११ पासून समाजकार्यात सक्रिय आहेत.दारुच्या व्यसनामूळे संसाराची घडी विस्कटलेल्या तळीरामांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सत्कार्य त्यांच्या हातून सुरु आहे.चंद्रपूर,गडचिरोलीसह शेजारच्या तेलंगणा राज्यातून आणि महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून भक्तगण मंडळी गोंडपिपरीत दारु व्यसनमुक्तीकरिता सत्संगाकरिता येतात.दर शुक्रवारी होणारा हा सत्संग कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून चौधरी गुरुजींच्या मार्गदर्शनात गोंडपिपरीत नियमित सुरु आहे.साधारणपणे पाच हजाराहून अधिक व्यसनाधिन मंडळी या माध्यमातून व्यसनमुक्त झाली.पेशाने शिक्षक असलेले गणपती चौधरी तालुक्यातील धाबा येथिल जनता विद्यालयात माध्यमिक शाळेत नौकरीला आहेत.संस्थेचे सचिव अशोक जिवतोडे यांच्या समाजाभिमूख कार्याने प्रेरित होऊन चौधरी गुरुजींची वाटचाल सुरु आहे.मूळचे तालुक्यातील वडकूली गावात सामान्य कुटूंबात जन्मास आल्यानंतर शिक्षणानंतर चौधरींनी नौकरी पत्करली.मात्र आपण जीवन जगतांना समाजाचे देणे लागतो,या जानिवेतून चौधरी गुरुजींनी दारु व्यसनमुक्तीचा लढा हाती घेतला.नेमक्या सहकाऱ्यांना घेत उभारलेला संघर्ष आज “कल्परुक्ष” झाला.हजारो लोकं आज संघटनेशी जुडली.एक तपाच्या लढ्याला यश आले.शेकडो संचाराची विस्कटलेली घडी वटणीवर आली.कित्येक संसारात आनंद पसरला.दारु व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या चौधरींनी आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळविला आहे.काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत गुरुजींचा विजय झाला.बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी आता ते काम करणार आहेत.चौधरी गुरुजींच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय ईतर मागासवर्गिय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी एका कार्यक्रमाचे निमित्त साधत त्यांचा नुकताच सत्कार केला.

कोड :-

समाजात जगतांना आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम सुरु केले.आणि लोकहिताचे असलेले हे कार्य निरंतर सुरु राहिल.

– गणपती चौधरी (गुरुजी)
अध्यक्ष,प.पु.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना,गोंडपिपरी.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!