राजुरा: तालुक्यातील पंचाळा येथे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उत्तम कापूस प्रकल्प व कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी दिन साजरा करण्यात आला. भारत हा कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन साजरा करण्यात येतो. पायल चोपावार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि दिन आणि सेकण्ड मॅड्युल बाबत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात शेती संबंधित विविध विषयांवर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आले.यामध्ये फूड स्पे,खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, जैविक कीटकनाशकाचा वापर,आंतर पीक ,बर्डर क्रॉप, आश्रय पीक, व त्याचे फायदे, मित्र किड संगोपन व संवर्धनाचे फायदे,फवारणी करताना घ्यावयाची काळजी,पीक विमा योजना, फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे योजना,तण व्यवस्थापन,स्त्री पुरुष समानता व शेतीमाध्ये महिलांचे योगदान काय आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आंनद बोरुले, मेघा करमनकर, जेंडर ट्रेनर बाबीलवार, कृषी सहायक राहुल वाघमारे उपस्थित होते.