HomeBreaking Newsबिग ब्रेकिंग : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार सरकारमध्ये सामील होणार...

बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार सरकारमध्ये सामील होणार ? राष्ट्रवादीचे आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार ?

मुबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन राजभवनाच्या दिशेने जात असल्याचे वृत्त समोर येत आहे.पण या भेटीचा नेमका विषय काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय भूकंपाला एक वर्ष होत नाही तोच आता राज्यात अजून एक भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून पक्षांमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे नमूद केली होती. यातच ते राजभवनावर दाखल झाल्याने अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का ? असा प्रश्न उभा राहिला आहे.याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती मिळाली नसली तरी देखील अजित पवार हे आपल्या पी ए सह राजभवनामध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे. अशावेळी ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा प्रकारचे वृत्त समोर येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!