बल्लारपूर तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या….  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बूभाई इसा यांनी  केली मांगणी

256

चंद्रपूर: येथील बल्लारपूर , विसापूर येथे फार जुने 1955 ते 1960 पासून विद्युत केंद्र होते.परंतु चंद्रपूर येथील महाऔष्णिक केंद्र सुरू झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.

सध्या चंद्रपूर आणि इतर तालुक्यातील बेरोजगारांची परिस्थिती बघता वर्तमानात रोजगाराची कोणतीही संधी उपलब्ध नाही. बल्लारपूर तालुक्यातील सर्वच उद्योग बंद आवस्थेत आहे. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ह्याच विषयाला घेऊन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव बब्बूभाई इसा ह्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच  भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.आणि सविस्तर चर्चा करण्यात  केली. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल असे आश्वाशन देण्यात आले. निवेदन देतेवेळी जिल्हा महासचिव बब्बूभाई इसा ह्यांच्या सोबत बल्लारपूर तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.