Homeचंद्रपूरइरई नदि पात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पती स्वच्छ करा;अन्यथा जल आंदोलन करण्याचा इशारा......

इरई नदि पात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पती स्वच्छ करा;अन्यथा जल आंदोलन करण्याचा इशारा… शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला जिल्हाधिकारी यांना निवेदन..

चंद्रपूर: शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात विठ्ठल नामाच्या गजरात दरवर्षी आषाढ पौर्णिमेला जत्रेचा कार्यक्रम होत असतो. यावर्षाही हजोरोच्या संख्येने भावीक व भक्तगण तीथे दर्शनाकरीता व रथयात्रा पाहण्याकरीता येत असतात. यावेळी असंख्य भक्तगण इरई नदिच्या पात्रात अंगोळ करण्याकरीता जात असतात.मात्र, इरई नदिच्या पात्रामध्ये जलपर्णी वनस्पतीने मोठ्या प्रमाणात वेढा घातलेला आहे.त्यामुळे भावीक, भक्तगणांना देवाचे पुजन व अंघोळ करण्याकरीता तीथे जाता येत नाही. याकरीता शुक्रवारी (ता. १६) रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा व मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना निवेदन देण्यात आले. इरई नदिच्या पात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पती आषाढ पोर्णिमेच्या अगोदर साफ न झाल्यास जल आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला आहे.जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदन देतांना शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे ,नयन डोईफोडे, वसंता पवार,आशिष खडसे, वृषभ धरणे,अक्षय सखदेव,सुधाकर गर्गेलवार उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!