Homeगडचिरोली२०२४ ला "गडचिरोली-चिमूर लोकसभा" महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार धर्मरावबाबा आत्राम...

२०२४ ला “गडचिरोली-चिमूर लोकसभा” महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार धर्मरावबाबा आत्राम लढविणार ! मुंबईत बैठक संपन्न !

गडचिरोली: २०२४ “गडचिरोली लोकसभा” निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आद.खा.शरदचंद्र पवार साहेब,पक्षाचे केंद्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील,विरोधी पक्षनेता मा.ना.अजितदादा पवार,खा.सुनील तटकरे,आ.छगन भुजबळ,आ.अनिलबाबु देशमुख,आ.दिलीप वळसे पाटील,महीला प्रदेश अध्यक्षा विद्याताई चव्हाण,युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख,आ.प्राजक्त तनपुरे,आ.मनोहर चंद्रिकापुरे,श्री.हेमंत टकले,श्री.शिवाजीराव गर्जे,अदिती नलावडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात संपन्न झाली, गडचिरोली,चंद्रपूर,आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष या बैठकीला हजर होते,त्यात प्रामुख्याने आ.धर्मरावबाबा आत्राम,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ऍड बाबासाहेब वासाडे,विभागीय महियल अध्यक्षा शहीनताई हकीम,महीला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर,सामाजिक न्याय विभागाचे जिलाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे,गडचिरोली युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,प्रदेश युवक कार्याध्यक्ष नितीन भटारकर, डॉ.रघुनाथ बोरकर,मेहमूद मुसा,विनोद नंदुरकर,प्रफुल महाजन,राजू मुरकुटे,अरविंद रेवतकर,यासह गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष व प्रमुख नेते या बैठकीला हजर होते.

या बैठकीत गडचिरोली लोकसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाने आपल्या कोट्यात घ्यावी कारण मागील १० वर्षांपासून ही जागा काँग्रेस पक्ष सतत लढत आहे आणि पराभूत होता आहे.काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही, आ.धर्मरावबाबा आत्राम हे या जागेसाठी सर्वात सशक्त आणि योग्य उमेदवार आहेत त्यामुळे या लोकसभेसाठी आ. धर्मरावबाबा आत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीची उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी तिन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर केली. आद.शरद पवार साहेबांनी स्पष्ट संकेत देत गडचिरोली लोकसभेची जागा आपल्याला लढवायची आणि जिंकायची आहे, तुम्ही सर्व तयारीला लागण्याच्या सूचना केल्या.या बैठकीत आ.धर्मरावबाबा आत्राम,राजेंद्र वैद्य,रवींद वासेकर,बाबासाहेब वासाडे,बेबीताई उईके,डॉ.रघुनाथ बोरकर,इत्यादींनी चर्चेत आपले विचार मांडले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!