Homeनागपूरडॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०२३.... संविधान फाऊंडेशनचे १५ जून रोजी नागपुरात...

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान-२०२३…. संविधान फाऊंडेशनचे १५ जून रोजी नागपुरात आयोजन… 

नागपुर – माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना २००५ मध्ये सुरू केलेला संविधान प्रास्ताविकेचे शाळांमधून वाचन व २६ नोव्हेंबर-संविधान दिन या देशातील पहिल्या ‘संविधान ओळख’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या जागरूक नागरिक/जबाबदार सामाजिक संस्था/मीडिया प्रतिनिधी यांना *डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाने* गौरवांकित करण्यात येणार आहे.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह (बानाईचे सभागृह), उरुवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे गुरुवार दि. १५ जून २०२३ रोजी दुपारी ३.०० वा. सदर समारंभाचे आयोजन करण्यात आले असून गडचिरोलीचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील (भापोसे) यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना सन्मानित करण्यात येईल. माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

     संविधान ओळख उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटना व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मानाने गौरवांकित करून त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधान फाऊंडेशनने हा सामाजिक उपक्रम कार्यान्वित केला असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

     दि. १५ जून २०२३ रोजी होणाऱ्या समारंभात अतुल सतदेवे (संविधान मैत्री संघ, गोंदिया), प्रा. युवराज खोब्रागडे (भंडारा), सुरज दहागावकर (चंद्रपूर), नूतन माळी (वर्धा), अशोक कोल्हटकर (नागपूर), रुबीना पटेल (नागपूर), एड. अंजली साळवे (नागपूर), महेश मडावी (अहेरी, गडचिरोली), पत्रकार देवेश गोंडाणे (लोकसत्ता, नागपूर), प्रा. राहुल मून (संविधान परिवार), नरेश साखरे (सम्यक थिएटर), जगजीत सिंह (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती), रामभाऊ आंबुलकर (जागृत नागरिक मंच), नितीन सरदार (दीनबंधू शिक्षण व सामाजिक संस्था), संघमित्रा गेडाम (मैत्रिणी ग्रुप), अरविंद गेडाम (बानाई), प्रफुल शेंडे (संविधान रक्षक दल), वैभव शिंदे पाटील (एक वादळ भारताचं), वंचित समूहाचे प्रतिनिधी खुशाल ढाक, रमेश धुमाळ, तुफान उईके, विशाल शुक्ला, रतन सिंह, जमीरभाई मदारी व प्रीती हजारे यांना गौरवांकित केले जाणार आहे.

     संविधान फाऊंडेशन द्वारा आयोजित या सन्मान समारंभास सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी-अधिकारी संघटना, शाळा-महाविद्यालयाचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सामाजिक सांस्कृतिक साहित्याचे क्षेत्रातील मंडळी, संविधान मित्र, संविधान दूत व संविधान प्रेमी नागरिकांनी मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान फाऊंडेशनच्या वतीने रेखा खोब्रागडे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाणे, शिरीष कांबळे, नेहा खोब्रागडे, विजय बेले, अल्का निरंजन, कल्पना कांबळे, विजय कांबळे, विभा कांबळे व छाया मेश्राम यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!