Homeचंद्रपूरविठ्ठल मंदिर प्रभागातील शाळा बंद असल्याने; विद्यार्थी शिक्षणापासून वंचित प्रभागातील...

विठ्ठल मंदिर प्रभागातील शाळा बंद असल्याने; विद्यार्थी शिक्षणापासून वंचित प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणार… शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी घेतला संकल्प….

चंद्रपूर: मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन समाजातील गरीब, असहाय्य,अपंग लोकांसाठी किंवा संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे नेहमी मदतीला धावून जात असतात. गेल्या सहा ते सात वर्षापासून विठ्ठल मंदिर या प्रभागातील शासकीय शाळा बंद पडली आहे.त्या परिसरात गोर गरिब तथा गरजू विद्यार्थी राहत असतात. या परिसरातील विद्यार्थी संख्या पाचशे ते सहाशे इतकी आहे. खाजगी ,शासकीय शाळा दूर असल्याने आणि महागडी शिक्षण त्यांना परवडणार नसल्याने विद्यार्थी तिथेपर्यंत जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही. विठ्ठल मंदिर प्रभागातील खाजगी व इंग्रजी शाळांमधील वर्ग पहिली ते दहावी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व संकल्प शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी घेतला आहे.

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” हा प्रेरणादायी मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिला होता. परंतु विठ्ठल मंदिर प्रभागातील खाजगी व इंग्रजी शाळांची दारे बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अनेक सामाजिक कार्य करून राहुल देवतळे यांनी समाजातील गोर गरीब,पिढीत वर्गाना न्याय मिळवून दिलेला आहे. अशातच विठ्ठल मंदिर प्रभागातील बंद असलेली शाळेची दारे खुली करून, एकच मिशन मोफत शिक्षण या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्याना शिक्षण उपलब्ध करून देणार असे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी सांगितले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!