Homeचंद्रपूरसावलीनरभक्षक वाघ अखेर जेरबंद; दोन जणांचा घेतला होता बळी वनविभागांनी घेतला निसुटकेचा...

नरभक्षक वाघ अखेर जेरबंद; दोन जणांचा घेतला होता बळी वनविभागांनी घेतला निसुटकेचा श्वास

सावली: तालुक्यातील वाघोली बुट्टी येथे दोन जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर हा टप्प्यात येताच वनविभागाच्या शुटर टीमने त्याच्यावर डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन) डागुन जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर शनिवारला यश आले. या वाघाची रवानगी चंद्रपूर येथे करण्यात आली आहे.
तालुक्यात गेल्या पंधरवडा पासून वाघाचा धुमाकूळ सुरु आहे. बेलगाव, थेरगाव, चिचबोडी, मोखाळा, वाघोली बुट्टी, व्याहाड बूज आणि व्याहाड खुर्द या गावात नरभक्षक वाघाचा शेतशिवार आणि लगतच्या झुडूपी जंगलात वावर सुरु होता. या वाघाने गावातील काही जनावरासह दोन जणांचा बळी घेतला होता. या वाघाच्या दहशतीने अनेकांनी शेतीत जाने सोडले, तर उन्हाळ्यात मोहफुले वेचावयास जाणारे लक्ष्य ठरल्याने अनेकांचा रोजगारहि बुडाला होता. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी वनविभागाला माहिती देऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु वनविभाग दिलेल्या माहितीकडे लक्ष देत नव्हते. अखेर या वागाहणे जनावरासह दोन मानव जिवांचा खात्मा केला. त्यामुळे सदर हे प्रकरण बघून नागरिकात संताप निर्माण होऊन तिव्र आक्रोश दाखवीत वनविभागाला तंबी दाखवीत या नरभक्षक वाघाला त्वरित मारा अन्यथा आम्ही मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेत वाघोली बुट्टी येथील नागरिकांनी मागणी केली. सदर प्रकरण बघता यावेळी प्रशांत खाडे विभागीय वनाअधिकारी चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनात शेडके व चौरे म्याडम सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी चंद्रपूर, गोरुडे व विरुटकर वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, क्षेत्र सहाय्यक सूर्यवंशी व्याहाड खुर्द यांना या वाघाला जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर आर आर यु टीम चंद्रपूर, पि आर. टी. टीम, सावली व व्याहाड खुर्द वनविभाग कर्मचारी यांची संयक्त चमू दाखल झाली. वागहाचे लोकेशन घेत गेल्या आठवड्या पासून वनविभागाची दोन पथके त्याच्या मागावर होती. वाघाला जाळ्यात अडकविण्यासाठी काही तांत्रिक बाबीचा वापर करण्यात आला. ट्राप कॅमेरे च्या लोकेशन नुसार, तसेच परिसरात आढळलेल्या वाघाच्या पगमार्क च्या सहाय्याने वाघ तिथे येईल हे गृहीत धरून तेथे पाळत ठेवण्यात आली होती. या परिसरात सावज बांधून सबंधित पथकाचे कर्मचारी रात्रभर बंकर केसमध्ये बसून पाळत ठेवून होते. आज दि. २७/५/२३ ला व्याहाड खुर्द येथील तलाव नर्सरी च्या परिसरात दुपारी १.३५ च्या सुमारास शिकारीसाठी सावजाकडे आला. अखेर हा वाघ टप्प्यात येताच वनविभागाच्या शुटर टीमने त्याच्यावर डार्ट (बेशुद्धीचे इंजेक्शन) डागला. बेशुद्ध होताच त्या वाघाला उचलून जेरबंद मध्ये आणण्यात आले आणि त्याची पशु वैद्यकीय अधिकारी डॉ खोब्रागडे यांनी त्याची तपासणी केली. या शुटर टिम मध्ये अजय मराठे, वनकर यांचा समावेश होता. या वाघाला जेरबंद केल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जेरबंद वाघाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. राहुल रायपुरे, व्याहाड खुर्द.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!