चंद्रपूर:- राष्ट्रवादी युवक काँग्रसचे चिमुर विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रदेश सरचिटणीस व गडचिरोली जिल्हा प्रभारी पदी आज निवड करण्यात आली.
प्रशांत घुमे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धडपडीने कार्य करीत असुन काहीही पाठबळ नसताना ग्रामीण भागात पक्ष वाढावा याकरिता सदैव ऍक्टीव्ह मोड मध्ये असतात.
यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिमुर विधानसभा अध्यक्ष म्हणून यांच्याकडे जवाबदारी होती. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला अपेक्षित बांधणी घुमे यांनी केली असल्यानेच त्यांची प्रदेश राष्ट्रवादीने दखल घेतल्याचे बोलले जात आहे.
सदर निवड राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल व विरोधी पक्ष नेते मा. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने रायुकाँ प्रदेशाध्यक्ष मा. महेबुब शेख यांनी केली असुन याबाबत अधिकृत पत्र काढण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बांधणीत उत्साहीपणे व सामंज्यसपणे कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिल्याबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटिल, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व रायुकाँ प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे आभार मानले.