Homeचंद्रपूरसंतोषसिंग रावत गोळीबार प्रकरणी दोन संशयित ताब्यात

संतोषसिंग रावत गोळीबार प्रकरणी दोन संशयित ताब्यात

चंद्रपूर : काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांच्यावर मुल येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी चंद्रपुरातून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. संशयीतांच्या तपासात रावत प्रकरणातील सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत हे मुल येथील बँकेच्या शाखेमधून 11 मे ला रात्री पाऊने दहा वाजण्याच्या सुमारास घरी जात होते. यावेळी बँकेसमोरच अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी चारचाकी वाहनातून संतोषसिंग रावत यांच्यावर गोळीबार करून जिवघेणा हल्ला केला. बंदुकीची गोळी हाताला चाटून गेल्याने रावत थोडक्यात बचावले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
या प्रकरणी दोन आठवड्याचा कालावधी होऊनही आरोपींना पोलिस शोधू शकले नाहीत. या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. राजकीय वर्तुळात रावत यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरावर निषेध होत असताना माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी रावत यांचे हल्लेखोर शोधण्यासाठी पोलिस विभागाला अल्टिमेट दिला. त्यानंतर वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना पत्र लिहून तात्काळ आरोपींना शोधण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष रावत आणि काही संचालकांची देखील चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दोन तरुणांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन्ही तरुण चंद्रपूर शहरातील असून, त्यांच्या चौकशीत रावत गोळीबार प्रकरणातील सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई चंद्रपूर शहर पोलिसांनी केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!