Homeगडचिरोलीअपयशाच्या खचका खावून जिद्दीने मिळवली चालक पोलीस शिपायाची आणि पोलीस शिपाई ची...

अपयशाच्या खचका खावून जिद्दीने मिळवली चालक पोलीस शिपायाची आणि पोलीस शिपाई ची पोस्ट..✨👮🏻‍♂️

गडचिरोली: जीवन खुप सुंदर आहे. जीवनाच्या वाळवंटावरून यशाची तहान भागविण्यासाठी नदीचा शोध घेताना अपयशाच्या पाऊलखुणा कित्येकदा पायाला काट्याच्या रूपाने टोचतात,वेदना देतात.पण आपण मात्र तहानलेले असतो आपल्या ला ती नदी गाठायचीच असते म्हणून पाय काट्यांनी रक्तबंबाळ झाले तरी आप ले‌पाऊल मात्र एकदा तिथं पोहचायच आहे असं ठरवलं की मागे वळतच नाही,उलट मागेची खचलेली वाट तुडवत नदी गाठत असते.यश अगदी खेचून आणू शकते.

अशीच प्रेरणा देणारी घटना आता चालक पोलीस शिपाईची आणि पोलीस शिपाई पदी निवड झालेल्या सुरज मधूकर कुमरे (२३ ) मु.नरोटी चक ता.आरमोरी जि.गडचिरोली या युवकाने घडवली. दोनदा आर्मी भरतीत निवड झाली पण पेपर मध्ये कमी गुण मिळाले म्हणून निवड झाली नाही,दोन दा एसआरपी,दोनदा एस एस सी जी डी अपयश आणि दोन दा गडचिरोली पोलीस भरतीत कमी अभ्यासामुळे अपयश आले.याच भरत्या दरम्यान खूपदा खचक्या खाल्या.ग्रांऊंड चांगलं बसलं की पेपरला अभ्यास कमी पडायच.म्हणून त्याला पण कुठे तरी खंत वाटून आपण कोणत्या इव्हेंट मध्ये कमी पडलो हे तपासायचा तर चूका लक्षात याचच्या . गावाकडे गेले की लोक टिक्का – टिप्पणी करायचे,हसायचे पण या गोष्टींकडे लक्ष दिले नाही.उलट या चुकामधून शिकून त्यानं गडचिरोली गाठून पुन्हा जोमाने सुरूवात केली. आई-बाबा कामावरून आल्यावर त्यांचा केविलवाणा चेहरा बघून थोडा बेक्कार वाटायचा.
काम तर आपल्याला जीवनभर करायचेच आहे.
चला ना मग एक चाॅन्स आपल्याला नशिबाने तर आजमावून च बघूयात म्हणून नाही दिलं तर गावाकडे जावून मोलमजुरी करायचं बघू. पण आताची २०२३ ची भरती देण्याचे ठरवले. जिद्दीने पेटून उठला.चालक आणि शिपाई या दोन्ही पदांकरिता अर्ज केला.आपण अभ्यासात आणि फिजीकल सगळ्यात मागे आहो म्हणून हळू हळू प्रॅक्टिस सुरू केली.दररोज ग्राउंड आणि वाचनालयाची आवड जोपासत अभ्यासात सातत्य,संयम ठेवत संघर्ष केला.शेवटी कष्टाची चीज झाली ..मेहनत फळाला आली.लागलेली कट ऑफ लिस्ट बघितल तर चालक पोलिस शिपाई व पोलिस शिपाई या दोन्ही पदासाठी निवड झालीय ..हे बघून त्याचे आनंदाश्रु डोळ्यात मावेनात.. शेवटच्या संधीने वर्दी मिळालीच…. माणूस खचला की प्रयत्न सोडून देतो.हे प्रयत्न सातत्याने नेहमी केलं तर आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते. असे सुरज ने आपल्या तगड्या मेहनतीच्या बळावर मिळालेल्या पोलीस शिपाई पदाची पोस्ट मिळवत दाखवून दिले. तर डबल सिट सिनेमातील गाणं खचलेल्या माणसाला जगण्याचं नवं बळ देवून जाते ते असे ” तु चाल पुढं सवर गड्या भिती कश्याची, परवा बी कुणाची ….! या गाण्याचा प्रत्यय सुरज ने आपल्या प्रवासातून दाखवून दिला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!