Homeगोंडपीपरीगोंडपिपरीत पत्रकारांचा तीन तास ठिय्या..

गोंडपिपरीत पत्रकारांचा तीन तास ठिय्या..

गोंडपिपरी: राज्यातील पत्रकारांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोंडपिपरीत व्हाॅईस आँफ मीडियाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी पत्रकारांनी तीन तास ठिय्या दिला.

सकाळी ११ वाजतापासून दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार आले.यावेळी व्हाॅईस आँफ मीडियाचे गोंडपिपरी तालुक्यात कार्यरत असलेल्या संपुर्ण विंगचे तालुका पदाधिकारी यासह विविध माध्यमातील कार्यरत पत्रकारांनी आपला सहभाग नोंदविला.आंदोलनानंतर तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.पत्रकारांच्या मागण्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे,कार्यध्यक्ष निलेश संगमवार,भाजपाचे तालुका अध्यक्ष बबन निकोडे,कार्यध्यक्ष साईनाथ मास्टे,माजी नगराध्यक्ष संजय झाडे,गोंडपिपरी बार कांसिलचे अध्यक्ष ॲड.राकेश कांबळे,अड.प्रफुल्ल आस्वले,व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सुहास माडूरवार,वैद्यकीय अधिकारी डा.अगडे,नगरसेवक महेन्द्रसिंह चंदेल,सामाजिक कार्यकर्ते दामोधर गरपल्लीवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.तालुक्यातील वीसहून अधिक पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होवून मागण्या लावून धरल्या.यात संदीप रायपूरे,बाळू निमगडे,राजू झाडे,राजकपूर भडके,बाबुराव बोंडे,सुरज माडुरवार,प्रमोद दुर्गे,प्रशांत कोसनकर,संदीप गव्हारे,कुणाल गायकवाड,नितीन पुद्दटवार,युवराज फलके,प्रसेनजित डोंगरे,चेतन मांदाडे,हर्ष महेशकर आदींचा सहभाग होता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!