चंद्रपूर: जिल्ह्यातील कोरपना,चिमुर,ब्रम्हपूरी,वरोरा आणि मुल येथीस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूका होत आहे. या निवडणूकीत सभापती,उपसभापतीची पद कोणाला मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.मागील एप्रिल महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या होत्या.या निवडणूकीत काही ठिकाणी भाजप तर काही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते.अनेक ठिकाणी बाजार समितीच्या निवडणूकीत काँग्रेस आणि भजपाने युती केली होती.त्यानंतरही आता सभापती,उपसभापती पदासाठी रस्सीखेच सुरु आहे.शुक्रवारी चंद्रपूर ,कोरपना,चिमूर,ब्रम्हपूरी,वरोरा आणि मुल या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती,उपसभापतींची निवडीची प्रक्रिया होणार आहे. शनिवारी १३ मे रोजी उर्वरीत बाजार सिमित्यांची निवडणूक होणार आहे.






