Homeचंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेत अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ध्यान शिबीर...

चंद्रपूर महानगरपालिकेत अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ध्यान शिबीर…

चंद्रपूर – येथील मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे ध्यान शिबिर घेण्यात आले. हा शिबीर सोमवार (ता.८) सायंकाळी पाच वाजता राणी हिराई सभागृहात घेण्यात आले.
योग आणि ध्यान अनेक वर्षांपासुन भारतीय संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. मात्र काही काळापासुन आधुनिकतेच्या नावावर आपण आपल्या आरोग्याविषयी इतके बेजजाबदार राहतो की , समाजाचा मोठा भाग हा मानसिक तणावग्रस्त आहे. सांस्कृतीक मंत्रालयाने एक सकारात्मक पाऊल ” हर घर ध्यान ” अभियानद्वारे उचलले आहे.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातुन ” हर घर ध्यान ” अभियान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात चालविले जात आहे. ममपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. वेगवान जीवनात, अनेक घटक उच्च-ताणाच्या पातळीत योगदान देतात. तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ध्यान हा जुना सराव आहे जो तणाव पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. व्यस्त जीवनशैली आणि व्यस्त दिनचर्येमध्ये ध्यानासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे.१० मिनिटांच्या ध्यान सत्राने तुम्ही तुमचा ताण कसा कमी करू शकता याचे मार्गदर्शन या शिबिरात करण्यात आले.
मुग्धा तरुण खांडे यांच्या पुढाकारातून योगिता वानखेडे,रवींद्र लाखे, वृंदा लाखे, प्रीती संघवी,स्वाती बच्चूवार या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमुने उपस्थित मनपा अधिकारी – कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन व आनंदी जीवनाचे रहस्य याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी राहण्याचे तंत्र व तणाव मापन चाचणी घेण्यात आली.आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने व्यायाम तसेच योग व ध्यान करण्याचा सल्ला दिला.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे,शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, सहायक संचालक नगररचना सुनील दहीकर,उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!