कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्याकरिता लेखणी बंद आंदोलन

631

बळीराम काळे, जिवती

जिवती : ( तालुका प्रतनिधी) कोरपणा व जीवती तालुका हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या दुर्गम भागात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यक्रम आरोग्य कर्मचारी क्षयरोग दुरी करण्याचे काम अत्यंत जबाबदारीने बजावत आहेत.
परंतु आमच्या अनेक प्रलंबित मागण्या अनेकदा शासनाच्या दरबारी विनंती करून ही शासनाने अद्याप आमच्या मागण्या मान्य केले नाहीत त्यामुळे आम्ही क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील सर्व कंत्राटी कर्मचारी दिनांक 1 मे 2023 पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत लेखी स्वरूपात मागण्या निकालात लागत नाही. तो पर्यंत आंदोलन सुरू राहील अशी माहिती सचिन बरडे मुख्य कार्यकारी अधिकारी इंटिग्रेड हेल्थ सोसायटी युनियन चंद्रपूर यांनी दिली.