चंद्रपूर: धारीवाल इ. लिमिटेड व पहेल मल्टिपर्पज सोसायटी अंतर्गत मुलांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने वर्ग 3 ते 5 व वर्ग 6 ते 8 या वर्गातील मुलांसाठी एकाच वेळेला सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. दहा गावातील एकूण 427 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मुलांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे.तसेच भविष्यात होणाऱ्या स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये याकरीता ही स्पर्धा घेण्यात आली.
या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये धारीवाल कंपनीचे महाप्रबंधक सोमेन बोरुआ (महाप्रबंधक), दिनेश गाखर (एच. आर. हेड) , अमोल गिरडकर (व्यवस्थापक) ,अनिश नायर (वैद्यकीय अधिकारी), धीरज ताटेवार (सहय्यक व्यवस्थापक) यांनी येरूर, सोनेगाव, शेनगाव, धानोरा येथे परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या.सर्व गावातील सरपंच, उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील यांनी परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या.
ही परीक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी पहेल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.