Homeचंद्रपूरजिवतीअपघातामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू...जिवती तालुक्यातील घटना..

अपघातामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू…जिवती तालुक्यातील घटना..

  1. जिवती: तालुक्यातील रोडगुडा पुलावरुन जात असतांना वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने दुचाकी चार ते पाच फुट पुलाखाली कोसळल्याने यात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी ( ता.८) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. तिघेही केकझरी येथील रहिवासी आहे. सचिन रामकिशन गायकांबळे (वय४०) आणि आयुष सचिन गायकांबळे(वय१५) असे मृतक बापलेकाचे नाव आहे. मृतक सचिन गायकांबळे यांच्या भावाचा मुलगा श्रेयश रमेश गायकांबळे हा गंभीर जखमी असल्याने त्याला जिवती वरुन जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर रेफर करण्यात आले.सदर झालेल्या घटनास्थळचा पोलिसांनी पंचनामा केला. दोघांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी गडचांदूर येथे पाठविण्यात आले. मृतक सचिन गायकांबळे हे आपल्या दोन्ही मुलांना जीवती येथील दवाखान्यात घेऊन आला होता.औषधी घेऊन दवाखान्यातून दोन्ही मुलांना दुचाकीने केकझरी या गावाकडे परत जात असतांना रोडगुडा या पुलावरुन दुचाकी कोसळल्याने अपघातात बाप लेकाचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. सध्या पुलाचे बांधकाम सुरु आहे.पुलाचे बांधकाम करत असताना आणि रस्त्यांचे कामे करत असताना पुलांना व रस्त्यांना कुठल्याही प्रकारचे कठडे अथवा जाळे न लावताच काम सुरु आहे. दोघांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!