चंद्रपूर : बल्लारपूर तहसील मधील नांदगाव(पोडे )या गावामधील मागील 7 दिवस पासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे आज पिण्यासाठी पाणी नाही. तसेच ग्रामपंचायत मधील सरपंच प्राजक्ता उरकुडे व ग्रामसेवक किशोर धकाते यांच्या चुकीचे नियोजनमुळे, गाव- मधील पाणी पुरवठा बंद असल्यामुळे,गाव- विरुद्ध काम करत असल्यामुळे गाव-मधील संपूर्ण नागरिकांना त्याचे त्रास सहन करावे लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते यांनी केली.
नागरिकांचे घरी पाणी नाही, तसेच नांदगाव ग्रामपंचायत सदस्य यांना विचार न घेता गाव बरबादी कडे नेत असल्यामुळे गाव मधील संपूर्ण नागरिकांनि आज रस्त्यावर उतरून चुकीचे धोरण-राबवत असल्याविरुद्ध आक्रोश ठिय्या आंदोलन केले तसेच नागरिकांनाचे मागणी होते सात दिवस पासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे तात्काळ सुरु करावे तसेच यानंतर पाणी पुरवठा बंद झाल्यास सरपंच यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांची केली आहे.






