चंद्रपूर: जिल्ह्यात 24 एप्रिल पासून भर उन्हाळ्यात मुसळार पावसाला झाली आहे. 1 मे 2023 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी चंद्रपुरात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह,वादळ वाऱ्यासह, मेघगर्जनेसह, मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बहुतांश ठिकाणी शहरातील गांधी चौक, मिलन चौक, महानगर पालिका परिसरात गारा पडल्या. पाऊस इतका मुसळधार होता की, शहरातील अनेक चौकातील रस्त्यावर भरपूर पाणी साचले होते. भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 2 मे यलो अलर्ट जारी केला आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.उन्हाळी हंगामात विशेषतः मिरची,काकडी,टरबूज, पालक अशा विविध भाजीपाल्याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी शेतात अथवा बाहेर ठिकाणी जात असताना मोबाईल सोबत नेऊ नये. शेतकऱ्यांनी शेतात काम करते वेळेस झाडाखाली न थांबता एखाद्या सुरक्षित ठिकाणी असरा घ्यावा. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी जनावरांची व स्वतःची काळजी घ्यावी.
Home Breaking News चंद्रपुरात मेघगर्जनेसह, वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात…. बहुतांश ठिकाणी पडल्या गारा;...






