Homeचंद्रपूरजिवती365 दिवस चालणाऱ्या पालडोह शाळेचे NMMS परीक्षेत उतुंग भरारी 4 विद्यार्थी झाले...

365 दिवस चालणाऱ्या पालडोह शाळेचे NMMS परीक्षेत उतुंग भरारी 4 विद्यार्थी झाले शिष्यवृत्ती धारक

जिवती: तालुक्यातील दुर्गम भागातील बहुल आदिवासी नक्षल भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह या 365 दिवस चालणाऱ्या शाळेने एन एम एम एस या परीक्षेत उंच भरारी घेतली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन. एम. एम. एस. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांकरिता आयोजित केली जाते सदर शाळेचे परीक्षा सेंटर गडचंदूरला होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह येथील 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात 12 विद्यार्थ्यांनी चांगले गुण घेऊन पात्र झाले. त्यापैकी चार विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची 60,000 रुपये च्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.त्यात कु विशाखा व्यंकटी देवकते ,रोहित प्रकाश पवार,प्रवीण सोनीबा धुळगुंडे व आदिनाथ सखाराम हुगे यांनी यात यश संपादन करत शाळेच्या नावलौकीकत भर घातली.या सर्वांनी मिळून शासनाची 2,40000 दोन लक्ष चाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवली.या परीक्षेसाठी मार्गदर्शक श्री राजेंद्र उदेभान परतेकी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. जिवती तालुक्यातील पालडोह या शाळेने मोठे यश संपादन केले आहे. 365 दिवस चालणाऱ्या शाळेचे नाव लौकिक केले.

या प्रसंगी शालेय व्यवस्थापण समिती चे अध्यक्ष तथा सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री आवारी सर,श्री पानघाटे सर, श्री कुचनकर सर, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षण प्रेमी शेषेराव देवकते व कोमल हाके शिक्षण प्रेमी यांनी सुद्धा त्यांच्या यशा बद्दल शुभेच्छा दिल्या.
पालकांना बोलावून त्यांचे अभिनंदन केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!