Homeचंद्रपूरशिक्षकांच्या समस्‍या निवारणार्थ 'समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा' उपक्रम आमदार सुधाकर अडबाले यांचा...

शिक्षकांच्या समस्‍या निवारणार्थ ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ उपक्रम आमदार सुधाकर अडबाले यांचा पुढाकार

चंद्रपूर : प्राथमिक, माध्यमिक व उच्‍च माध्यमिक विभागातील मान. शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), जिल्‍हा परिषद यांच्याकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या संकल्‍पनेतून ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्‍च माध्यमिक विभागातील अनेक समस्‍या/प्रकरणे प्रलंबित आहेत. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून श्री. सुधाकर अडबाले निवडून आल्‍यानंतर शिक्षकांच्या या प्रलंबित असलेल्‍या समस्‍या मार्गी लावण्यासाठी नागपूर विभागातील जिल्‍हानिहाय हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रथमतः चंद्रपूर जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्‍हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांच्याकडे प्रलंबित असलेल्‍या प्रकरणांची माहिती माननीय आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्या नावाने थोडक्‍यात अर्ज लिहून 9284723492, 9850323845 या व्‍हॉट्‌सॲप नंबरवर अर्ज व इतर माहिती ३ मे २०२३ पर्यंत पाठवावी. त्‍यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या समस्‍या निकाली काढण्यात येईल. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील ज्‍यांच्या समस्‍या प्रलंबित असतील त्‍यांनी आपले अर्ज लवकरात लवकर पाठवावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!