Homeचंद्रपूरजिवतीमोकाट जनावरांचा रस्त्यावरच मधोमध थांबा... मोकाट जनावरांच करायचं काय? नागरिकांची प्रश्न...

मोकाट जनावरांचा रस्त्यावरच मधोमध थांबा… मोकाट जनावरांच करायचं काय? नागरिकांची प्रश्न…

बळीराम काळे, जिवती

जिवती : (तालुका प्रतिनिधी) नगर पंचायत जिवती तालुका अंतर्गत येणाऱ्या मोकाट जनावरांचा रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला कळप,दुकानदारांना डोके दुःखी बनली आहे.

ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये मोकाट जनावरे तोंड घालत असणारी व भररस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहन चालकास,वाहानकोंडी होत असतो,आणि भररस्त्यात मोकाट जनावरांची एक मेकात झुंज होत असताना अनुभवास येत आहे.तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण ठरणाऱ्या या मोकाट जनावरांमुळे अनेकजणांना अपघाताला समोर जावे लागत आहे; परंतु या मोकाट जनावरांचा कायमचा बंदोबस्त करण्यास मात्र कोणीही सामोर येताना दिसून येत नाही.

मुख्यतः शहराच्या मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातही मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोकाट जनावरांचा इतका धुमाकूळ घातलाय की,जनावरे दिसली की, नागरिकही काढता पाय घेतात.शहरातील विर बाबुराव शेडमाके चौक,बाजार चौक, कुंभेझरी चौक,इत्यादी व बरेच ठिकाणीजनावरांचे मोकाट कळप दिसून येतात.काही जनावरे तर रस्त्याच्या मध्यभागी बसलेली असतात.

हकळण्याचा प्रर्यत्न केला जातो पण,तीतून हटता हटत नाही.यास त्रासून त्यामुळे स्थानिक नागरिकांनी व बाहेरून येणारे नागरिक यांनी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नगर पंचायत जिवती प्रशासनाने त्या मोकाट जनावरांना कोंडवड्यात टाकावे व त्या जनावरांच्या मालकांचा शोध लावून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नागिकांमधून केली जाते आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!